Tuesday, September 26, 2023
Homeपुणेवडगावकोविड सेंटर मध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था करावी,मावळ तालुका भाजप महिला आघाडी..

कोविड सेंटर मध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था करावी,मावळ तालुका भाजप महिला आघाडी..

लोणावळा प्रतिनिधी श्रावणी कामत -प्रदेश महीला मोर्चा अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने मा.तहसीलदार साहेब वडगाव मावळ व मा.पोलीस निरीक्षक सो.वडगाव मावळ यांना आज निवेदन देण्यात आले.
कोविड सेंटर मध्ये महिलांकरिता स्वतंत्र वार्डची निर्मिती करून तेथील सुरक्षितेकरिता महिला पोलीस स्टाफची नेमणूक करावी या मागणीसाठी प्रमुख उपस्थिती मावळ तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, सभापती निकीता घोटकुलें, प्रदेश उपाध्यक्षा ज्योतीताई जाधव,प्रदेश सदस्या कोमलताई काळभोर,महिला आघाडी कार्याध्यक्षा सुमित्राताई जाधव, महिला आघाडी पुणे जिल्हा सरचिटणीस श्रिया राहाळकर , मावळ भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी,मावळ तालुका महिला आघाडी सरचिटणीस वैशालीताई ढोरे,सरचिटणीस आनिताताई सावले, संघटक सरचिटणीस कल्यानीताई ठाकर, उपाध्यक्ष शोभा भेगडे नाणे मावळ अध्यक्ष सीमाताई आहेर, पवन मावळ कार्याध्यक्ष रचनाताई विधाटे, तळेगाव महिला अध्यक्षा अंजलीताई जोगळेकर,सह महीला भगिनी उपस्थित होत्या.
- Advertisment -