
मावळ : क्लब महिंद्रा व रोटरी क्लब लोणावळा यांच्यातर्फे स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सडवली गावात विविध उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
सडवली गावातील ग्रामस्थांसाठी आठ लाख लिटर पाण्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात आला त्याचा लोकार्पण सोहळा क्लब महिंद्राचे लग्न क्लस्टर मॅनेजर बिपलाप बॅनर्जी, रोटरी अध्यक्ष जयवंत नलोडे,सरपंच अजित चौधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
क्लब महिंद्रा व रोटरी यांच्यावतीने सडवली या गावातील चौकाचौकात सौरदिवे बसविण्यात आले आहेत यांचे उदघाटन करून २०० फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले केलेल्या स्तुत्य सहकार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने क्लब महिंद्राचे क्लस्टर मॅनेजर बिपलाप बॅनर्जी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब पाटील यांनी केले ग्रामस्थांनी क्लब महिंद्रा व रोटरी क्लब लोणावळा यांच्याकडे शालेय इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव ग्रामस्थांनी सादर केला. त्यावर अध्यक्ष जयवंत नलोडे, माजी अध्यक्ष बापू पाटील,रवींद्र कुलकर्णी कलस्टर मॅनेजर बिपलाप बॅनर्जी यांनी विचार प्रकट केले.
प्रस्ताव मंजूर करण्यात येईल अशी हमी देण्यात आली. गावात सांडपाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून अंतर्गत गटारीचे काम क्लब महिंद्रा व रोटरी क्लब तर्फे तात्काळ केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
यावेळी क्लब महिंद्राचे प्रकल्प प्रमुख सतीश कुमार, एच आर एक्झिक्यूटिव्ह आंबेकर, रोटरी क्लब लोणावळ्याचे सचिव अशिष मेहता, माजी अध्यक्ष कुंडलिक वानखेडे, गोरख चौधरी, रवींद्र कुलकर्णी, उदय पाटील, बापूसाहेब पाटील, रोटरी नारायण शेरावले व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या उपक्रमांविषयी कौतुक करून सर्वांचे आभार मानले.