![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): मंकी हील खंडाळा येथे धावत्या रेल्वे गाडीच्या धडकेने डोके फुटून जेष्ठ इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि.21 रोजी 1:30 च्या अगोदर रेल्वे कि. मी. नं.121/400 जवळ घडली आहे.सदर मृत इसम हा अनोळखी असून याचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोहमार्ग पोलीस हवालदार ऐ. डी. जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार मयत इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.- रंग गहुवर्णीय, शरीर बांधा किरकोळ, दात सफेद, कान बारीक, कपाळ मोठे, चेहरा उभट, ओठ पातळ, दाढी मिशी पिकलेली पांढरी, केस पांढरे, उंची 5 फूट 8 इंच असे आहे. तर मयत इसमाच्या अंगावर काळ्या रंगाचा स्वेटर, चॉकलेटी रंगाचा हाफ बर्मुडा, राखाडी रंगाची मुन कंपनीची अंडरवेअर नेसनीस आहे.
सदर मयत इसम कोणाच्या ओळखीचा परिसरातील असल्यास पुणे लोहमार्ग पोलीसांशी संपर्क साधावा.