खंडाळा येथील दरीत वाट चुकलेल्या दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टिमला यश…

0
363

लोणावळा दि. 25:खंडाळा येथील कातळधार धबधब्याजवळ वाट चुकलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने सुखरूप बाहेर आणून सोडले.

कातळधार धबधबा परिसरात अनिकेत नेमाणे व प्रज्वल पवार दोघेही रा. तळवडे, पुणे हे दोन तरुण धबधबा परिसरात गेले आहेत व ते वाट चुकून दरीतच भरकटले असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला मदतीसाठी बोलावले असता शिवदुर्ग पथकाचे रोहित वर्तक, रितेश कुडतरकर, हर्ष तोंडे, दिपाली पडवळ, मोहित काटकर या पथकाने तब्बल चार तास अथक प्रयत्न करून त्या दोघांना सुखरूप कातळधार धबधबा परिसरातून बाहेर काढले असून शिवदुर्ग रेस्क्यू पथकाचे हे मदत कार्य खरोखर च कौतुकास्पद आहे.