Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाखंडाळा येथील भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिन दिमाखात संपन्न…

खंडाळा येथील भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिन दिमाखात संपन्न…

लोणावळा(प्रतिनिधी):खंडाळा येथील भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा सातवा वर्धापन दिन दिमाखात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाकडून विविध क्षेत्रातील, विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भैरवनाथ जेष्ठ नागरीक संघाची स्थापना होऊन दि.26 जानेवारी 2023 रोजी सात वर्ष पुर्ण होत संघाचे आठव्या वर्षात पदार्पण झाले.सातवा वर्धापन दिन साजरा करताना भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाच्या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सर्व आजी माजी नगरसेवक लो.न.पा. व समाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथम दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करत भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच ऍड. श्रीकांत दळवी यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ बाबुभाई पुखराज ओसवाल (हास्यक्लब, शिळफाटा खोपोली) यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले,तर मावळ तालुका भजन स्पर्धेत खंडाळा महिला भजनी मंडळ यांनी पाचवा क्रमांक व महिला मंडळामध्ये प्रथम मिळवील्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मावळ तालुका भजन स्पर्धेत उत्कृष्ट पेटी वादक महादेव कोंडीबा दळवी यांनी प्रथम क्रमांक मिळवील्या बद्दल त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
डॉ. सौ. दिपाली श्रीकांत दळवी यांनी डॉक्टरेट पदवी मिळवल्या बद्दल, व शुभांगी किरण गायकवाड यांची श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि. संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला, त्याचबरोबर खंडाळा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मंगेश येवले यांच्यावतीने वडिलांच्या स्मरनार्थ जेष्ठ नागरिक संघातील दर महा पाच जेष्ठ नागरिकांना औषध उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रमाची सुरुवात प्रथम धनादेश सुपूर्द करून करण्यात आली.
यावेळी लोणावळा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, राऊत (सर ), मा. नगरसेविका अंजली कडू, पूजा गायकवाड, रचना सिनकर, संत तुकाराम साखर कारखान्याच्या संचालिका शुभांगी गायकवाड,भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष गोपीचंद सोनवणे, खोपोली हस्य क्लबचे बाबुभाई ओसवाल, साहेबराव टकले, जिवन गायकवाड, परेश बडेकर, मंगेश येवले, दत्तात्रय दळवी यांसह परिसरातील अनेक मान्यवर कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोहिते व गोपीचंद सोनवणे यांनी केले प्रास्ताविक अशोक मानकर तर विजय सिनकर यांनी आभार प्रदर्शन केले.

You cannot copy content of this page