खंडाळा येथे टेम्पो व दुचाकीचा अपघात… दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू…

0
31

( मावळ प्रतिनिधी : संदीप मोरे ),
लोणावळा : दि. 08, रोजी खंडाळा गावच्या हद्दीत टेम्पो व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा मृत्यू.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि. 08 रोजी सकाळी 08: 45 वा. च्या सुमारास खंडाळा येथील कोहिनुर इन्स्टिटयूटच्या समोर हा अपघात झाला. दुचाकीस्वार रमेश अशोक आगळे ( वय 41, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, पुणे, रेल्वे पोलीस, खोपोली ) हे त्यांची दुचाकी क्र. एम एच 22 ए सी 9975 यावरून खोपोली येथील ड्युटी संपवून घरी जात असताना टाटा टेम्पो क्र. एम एच 14 इ एस 0965 याची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात रमेश आगळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने खंडाळा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्या प्रकरणी लोणावळा शहर पो. स्टेशनला टेम्पो चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास लो. पो. स्टेशनचे एस आय – सचिन बाळासाहेब शिंदे करत आहेत.