Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाखंडाळा येथे पोलिसांनी विनापरवाना दारू विक्रेत्यावर छापा मारत तब्बल 68 हजाराचा माल...

खंडाळा येथे पोलिसांनी विनापरवाना दारू विक्रेत्यावर छापा मारत तब्बल 68 हजाराचा माल केला जप्त…

लोणावळा (प्रतिनिधी) : खंडाळा येथे अवैद्य देशी व विदेशी दारु विकणाऱ्या एका व्यक्तीवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 68,220 रुपयांचा माल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार मयूर अबनावे यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली असून दारू विक्रेते अजय रामचंद्र जांभुळकर (वय 56 वर्षे, रा. शिवाजी पेठ, खंडाळा, ता मावळ, जि पुणे) याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अजय जांभुळकर यांच्याकडून 52 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडची दारू तसेच बियर जप्त केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page