Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाखंडाळा येथे भरधाव वाहनाच्या धडकेने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू…

खंडाळा येथे भरधाव वाहनाच्या धडकेने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी): भरधाव वाहनाच्या घडकेने 40 ते 45 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात दि.15 रोजी रात्री 10 वा. पूर्वी मुंबई पुणे महामार्ग खंडाळा येथील आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या एटीएम जवळ घडला.
या बाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई भुषण दशरथ कुवर यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात वाहन चालका विरोधात भा.द. वी.का.कलम 279,304(A), मोटर वाहन कायदा कलम 134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अपघातात मयत झालेला अनोळखी इसम हा मुंबई पुणे जुना महामार्ग येथील आय. सी.आय.सी.आय. एटीएम समोरील दगडी बंगला या कमानी समोरून जात असताना.भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक लागून त्याचा मृत्यू झाला आहे.यातील आरोपी अज्ञात वाहन चालकाने त्यांचे ताब्यातील वाहन हे हयगईने, अविचाराने व बेदरकार चालवुन अनोळखी पुरुष वय वर्षे अंदाचे 40 ते 45 यास धडक देवुन त्यास गंभीर जखमी करुन त्याच्या मृत्यूस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता निघुन गेला असून याप्रकारणी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा अहवाल मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगांव मावळ न्यायालय यांच्याकडे रवाना करण्यात आला आहे.पोलीस हवालदार शकील शेख हे दाखल अंमलदार असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page