खंडाळा येथे होणाऱ्या बेकायदेशीर दारू विक्रीवर चाप बसणार का नाही…

0
759

लोणावळा : खंडाळा बाजारपेठेत बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याच्या अनेक घटना नागरिकांकडून उघड होत आहे.

कोणत्याही प्रशासनाच्या परवानगी शिवाय खंडाळा मुख्य बाजारपेठेत दारू विक्री जोमाने सुरु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. ही बेकायदेशीर दारू रहदारीच्या वस्तीत सुरु असल्याने याठिकाणी दिवसभर व रात्री अपरात्री दारू घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच याठिकाणी दारू खरेदी करणाऱ्या काही ग्राहकांकडून सदर विक्री करण्यात येणारी दारू ही निकृष्ट दर्जाची म्हणजेच डुप्लिकेट असल्याच्याही प्रतिक्रिया मिळत आहेत.

लोणावळा पोलीस प्रशासनाकडून अनेक वेळा या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तरी सुद्धा आजही हे बेकायदेशीर धंदे बिनधास्तपणे सुरु असल्याचे समजते आहे.

खंडाळा येथील बेकायदेशीर दारू विक्री बंद होणार का? यांच्यावर कोणी कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला असून याबाबत लोणावळा शहर पोलीस निरीक्षक व डी वाय एस पी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे अशी विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.