Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाखंडाळा शिग्रोबा जवळ प्रवासी बस दरीत कोसळली,12 जणांचा मृत्यू तर 30 जण...

खंडाळा शिग्रोबा जवळ प्रवासी बस दरीत कोसळली,12 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी…

लोणावळा (प्रतिनिधी): 41 प्रवासी घेऊन जाणारी एक खाजगी बस आज शनिवारी पहाटेच्या 4 वाजण्याच्या सुमारास खंडाळा बोर घाटात जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिंग्रोबा घाट उतरताना दरीत कोसळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोरेगाव येथील ढोल लेझीम पथकातील ही मंडळी पिंपरी याठिकाणी ढोल लेझीम खेळासाठी गेली होती. यात गोरेगाव सोबतच कांदिवली तसेच खोपोली मधील देखील काही जण समाविष्ट होते.
त्या ठिकाणावरून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस दरीमध्ये साधारण 200 ते 250 फूट खोल गेली. या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला असून 28 ते 30 जण जखमी झाले आहेत. यातील 3 ते 4 जण गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतांमध्ये 2 लहान मुलं तसेच 2 ते 3 मुली असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती समजताच बोर घाट पोलीस, खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू पथक, खोपोलीतील अनेक रुग्णवाहिका व नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले असून दरीत जखमी प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 25 जणांना खोपोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page