
खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबेली ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून गेली अनेक वर्षे ग्रामस्थ या रस्त्यांसाठी प्रशासनाविरोधात संघर्ष करावा लागत आहे.खाणाव ग्रामपंचायत हद्दीत ही खडई धनगरवाडा हे गाव येत असून खरिवली ग्रामपंचायत मध्ये करंबेली ठाकूरवाडी येत आहेत येथे प्रामुख्याने आदिवासी ठाकूर, आणि धनगर समाज प्रामुख्याने राहत असून येथील काही ग्रामस्थांचा दूध व्यवसाय तर काहीं मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
त्यांना दररोज 4 किमीची पायपीट करून डोक्यावर दुधाच्या किटल्या घेऊन तर काही ग्रामस्थांना, मोलमजुरीसाठी तर शाळेतील लहान मुलांना पायपीट दररोज करावी लागत आहे.
देशाला स्वतंत्र मिळून 74 वर्ष झाले तरी अजूनही ही गावे विकासापासून कोसो दूर आहेत,या गावात मुलभूत सुविधांही ग्रामस्थांना मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे तर येथील व्यक्ती रात्री अपरात्री आजारी पडल्यास त्याला झोळी करून अंधारातून चिखलातून वाट काढीत दवाखान्यात न्यावे लागते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 132 सरकार दप्तरी या रस्त्याची नोंद आहे,मात्र प्रत्यक्षात या रस्त्याचे काम अद्याप झाले नाही, त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे, कुठल्याही राजकीय नेत्यांना किंवा पुढार्यांना या गावाचे काही सोयरसुतक पडलेले नाही ,ते गावाकडेअद्याप लक्षही देत नाहीत ,यासाठी ग्रामस्थ 6 आक्टोबर रोजी रायगड जिल्हा परिषदेवर धडक मोर्चाचे आयोजण करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करून आमच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करावा या मागणीसाठी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे.
प्रतिक्रिया-
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही खडई धनगरवाड़ा येथे राहत असून आमच्या गावाकडे जाणाऱ्या अतिशय दयानिय अवस्था झाली असून आमच्या गावात अद्यापही रस्ता नाही त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ 6 आक्टोबर रोजी जिल्हापरिषदवर मोर्चा काढून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी करणार आहे.