खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा…. कर्जतमधील मुख्य रस्त्यांची दुरावस्था..

0
63

( कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाने)

कर्जत दि.११: कर्जत शहरातील रेल्वे गेट व श्रद्धा हॉटेल पर्यंत, भिसेगाव परिसर ते चारफाटा पर्यंत रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे.ह्या विभागातील नक्की रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे.
ह्या रस्त्यावरून पनवेल,पेण, मुरबाड असे अनेक ठिकानचे नागरिक प्रवास करीत असतात, परंतु परिसरात सर्वत्र रस्त्याची संपूर्ण चाळण झाली आहे.कर्जत चारफाटा पर्यंत प्रवास करतेवेळी मोठी कसरत करावी लागत आहे.
ह्या रस्त्यावरून बरेच प्रवासी येत जात असतात. कर्जत शहरातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष का?असे प्रश्न स्थानिकांमध्ये निर्माण झाले आहेत. सदर चारफाटा ते भिसेगाव रेल्वे गेट रस्त्याचा वनवास कधी संपणार अशा अपेक्षेत नागरिक आहेत.तरीही सदर रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने ह्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी कर्जतकरांची मागणी आहे.