खोपोली- दत्तात्रय शेडगे
छत्तीशी विभागातील ग्रामीण भागातील दत्ता भोईर यांच्या भोईर क्लासच्या विद्यार्थ्यांनि दहावी मध्ये सानिका मनोहर पाटील, ८७.४० % वैभव गणपत पाटील ८१.४०% व सुमित सुनील उतेकर ७७% असे घवघवीत यश मिळवून भोईर क्लासेस ची दहा वर्षांची १००% यशाची परंपरा कायम ठेवली, तर विद्यार्थ्यांना शिक्षिका अस्मिता उतेकर ह्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शिकवीत आहेत.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात खरीवली येथे शिक्षक दत्ता भोईर यांचा भोईर क्लास असून या क्लास मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहेत, यावर्षी या क्लास मध्ये २६ विद्यार्थी होते सगळे विद्यार्थी या वर्षी उत्कृष्ट गुण मिळवून पास झाल्याने पुन्हा एकदा या क्लासची दहा वर्षाची यशाची परंपरा विद्यार्थ्यांना कायम ठेवली असून भोईर क्लास नाव पुन्हा एकदा तालुक्यात उज्वल केले आहे.
तर या क्लासेस च्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून प्रथम सायन्स सेंटर च्या माध्यमातून वेळोवेली विद्यान( सायन्स ) चे चर्चासत्र आयोजित करून विद्यार्थ्यांना अनेक प्रतिक्षिके करून दाखविले जातात,.