Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी मोर्चा..

खालापुरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी मोर्चा..


पंचायत समितीवर मोर्चा काढून दिले निवेदन …

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

खालापूर. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी खालापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनी आज खालापूर पंचायत समितीवर मोर्चा काढून आपल्या मागाण्यांचे निवेदन पंचायत समितीचे सहायक प्रशासकीय अधिकारी संजीव चोपडे यांना देण्यात आले.


यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळण्यास अडथळा ठरणारी वसुली आणि उत्पनाची अट रद्द करणे, किमान वेतन ,राहणीमान भत्ता वेतनापोटी शंभर टक्के मिळाला पाहिजे,कालबाह्य ठरणारा जाचक लोकसंख्येचा आकृतीबंध रद्द करावा, ग्रामपंचायत कर्मचा-याना वेतन श्रेणीसहित कायम कर्मचारी प्रमाणे सर्व आर्थिक लाभ,ग्रॅज्यूअटीसाठीची दहाविची अट आणि पाच लाख मर्यादा रद्द करून सर्व कर्मचा-याना लागू करावे,जिल्हा परिषद कर्मचा-याप्रमाणे निवृत्ती वेतन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढून पंचायत  समितीचे सहाय्यक प्रशासकिय अधिकारी संजीव चोपडे याना निवेदन देण्यात आलेे.

करमचाऱ्यांचा मागण्याचे पञ जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी याना पाठविण्यात आल्याचे अधिकारी चोपडे यानी सांगितले.त्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या मोर्च्यात अनेक तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page