Wednesday, September 18, 2024
Homeक्राईमखालापुरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय, शेतकरी भाऊ शेडगे यांची म्हैस कापून मांस...

खालापुरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय, शेतकरी भाऊ शेडगे यांची म्हैस कापून मांस घेऊन चोरटे पसार..

खालापुरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय,शेतकरी भाऊ शेडगे यांची म्हैस कापून मांस घेऊन चोरटे पसार,खोपोली पोलिसात तक्रार दाखल ,तपास सुरु..

खोपोली – दत्तात्रय शेडगे खालापुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसा पासून पाळीव जनावरे कापून त्यांचे मांस घेऊन जाणारी टोळी सक्रिय झाली असून मंगळवारी दस्तूरी येथील शेतकरी भाऊ बाबू शेडगे यांची एक म्हैस जाग्यावर कापून तिचे मांस घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे त्यामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गारलमाल भागात मोठ्या प्रमाणत दुग्ध व्यवसाय करणारी मंडळी असून एक लाखाहून अधिक किमतीच्या म्हशी खरेदी करून दररोज हिरवा चारा पाणी देण्यासह अन्य मेहनत घेऊन या म्हशी चे पालन केले जाते व कटुबाचा उदरनिर्वाह केला जातो मात्र या दुग्ध व्यवसायच्या म्हशी ची हत्या करून त्यांचे मांस घेऊन जाणारी टोळी अनेक दिवसापासून सक्रिय झाल्याने हा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.
येथील भाऊ शेडगे यांच्या म्हशी या भागातच चाऱ्या साठी सोडल्या असताना मंगळवारी यातील एक म्हशींची हत्या करून तिचे मास घेऊन हे अज्ञात चोरटे पशार झाले आहे या बाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ भाऊ शेडगे यानी या घटनेची खोपोली पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत,खालापूर तालुक्यातील धनगर समाज दूध व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दुभत्या, गाई म्हशी आहेत, मात्र मुबंई पुणे जुन्या महामार्गावर दस्तूरी जवळ घडलेल्या घटनेने शेतकरी भाऊ शेडगे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेने तालुक्यातील दूध व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे
- Advertisment -

You cannot copy content of this page