खालापुरात भाजप जन आशीर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत..

0
89

प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे
भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात जन आशीर्वाद यात्रा राबविण्यात येत आहेत त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील पाली फाटा येथे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांना देखील जन आशीर्वाद यात्रेची धुरा देण्यात आली असून ही यात्रा कोककडे जात असताना पालीफाटा येथे भारतीय जनता पार्टी खोपोली खालापूर यांचे वतीने नारायण राणे व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बाळदी, माजी आमदार देवेंद्र साटम, आदीसह अनेक तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.