if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली-(दत्तात्रय शेडगे) धनगर समाजाचे आराध्यदैवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती 31 मे रोजी खालापुरात धनगर समाज बांधवांनी घराघरात राहून साजरी करण्यात आली.
देशावर असलेल्या कोरोना महामारीची संकट याची दखल घेत आज धनगर समाज बांधवांनी कुठेही गर्दी न करता सोशल डिस्टन्सचे पालन करीत प्रत्येक घरोघरीं राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.तर ग्रुप ग्रामपंचायत आतंकरगाव मध्येही अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
तर काटरंग धनगरवाडा येथे धनगर समाज बांधव राम आखाडे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमिताने सत्यनारायण महापूजा करून अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली ,