Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात राष्ट्रवादीमध्ये " अभूतपूर्व गर्दीत ऐतिहासिक पक्ष प्रवेश "..

खालापुरात राष्ट्रवादीमध्ये ” अभूतपूर्व गर्दीत ऐतिहासिक पक्ष प्रवेश “..

” अन्याय – अत्याचार – हुकुमशाही – दादागिरी ” उलथवून टाकण्यासाठी मी निवडणूक लढणार – सुधाकर भाऊ घारे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” सांगतील ते धोरण , व बांधतील ते तोरण ” , या मुख्य उद्देशाने कर्जत मतदार संघातील खालापूर मध्ये हॉटेल अंकल किचन येथे आयोजित केलेल्या सर्व साधारण सभेला अभूतपूर्व गर्दी व ऐतिहासिक पक्ष प्रवेश झाल्याने ” सुधाकर भाऊ घारे तुमचा नाद नाही ” , अशीच काहीशी प्रतिक्रिया सर्वांच्याच ओठी आली . रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ चा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अविस्मरणीय ठरला . ४ गेले पण ४०० आमच्या पक्षात आले , अशी भीष्म गर्जना करत राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर बरसले , व गर्दीतून त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला.

आज खालापूर तालुक्यातील अभूतपूर्व गर्दीत ऐतिहासिक पक्ष प्रवेश झाला . काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हनुमंत पिंगळे काही कार्यकर्त्यांना घेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता , त्याचा ” वचपा ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी काढला . शिवसेना शिंदे गटाचे नावंढे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पिंगळे, माडपचे सतिष घोडविंदे व चार ग्राम पंचायत सदस्य, घोडीवलीचे आय काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच संजय पिंगळे, अनंता हडप, अंकुश हडप , गोरठण बुद्रुक मंगेश काईंनकर , शेखर पिंगळे, संदेश कांबळे, उल्हास देशमुख, चंद्रकांत देशमुख, रामदास हडप , आदर्श मानकवळे, मुकुंद सकपाळ, गोविंद वालम, शंकर बोधले आणि सागर दामले यां होणाड , आत्करगाव , वावोशी, नावंढे , आडोशी , वडवळ , जांबरुंग ठाकूरवाडी , टेंबेवाडी, होनाड, खरवई , घोडिवली आदी गावातील शिवसेना शिंदे गट , ठाकरे गट , मनसे , काँग्रेस , या पक्षाच्या तब्बल ११ गावातून १२०० हुंन अधिक पदाधिकारी , कार्यकर्ते हे राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्याने कर्जत खालापूरच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली . यानिमित्ताने ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे हात मजबूत झाले असून खालापूर तालुक्यात आत्ता ” एक नंबरचा ” पक्ष राष्ट्रवादी झाला असल्याचे चित्र पहाण्यास मिळाले.

आमच्याकडे कुठलेही पद नाही तरीही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , रायगडचे नेते तथा प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे , यावर सुधाकर भाऊ घारे यांनी प्रकाश टाकत येथील विकास हा आंम जनतेचा झाला नसून कुटुंबाचा – नातेवाइकांचा व स्वतःचा विकास झाला असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप करत ते कडाडून बरसले . येथे ना रस्ते झाले , ना पाणी टंचाई सोडवली , ना रोजगार संपुष्टात आला , ना महिलांचे प्रश्न सुटले , एका आमदाराचे काय काम असते ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला . येथील कंपनीत काम मिळवण्यासाठी हातपाय पडायला लागते , अशी तरुणांची तक्रार असून कुणी आवाज उठविल्यास त्याच्यावर खोट्या केसेस दाखल करायच्या , म्हणूनच हा अन्याय – अत्याचार – हुकुमशाही – दादागिरी उलथवून टाकण्यासाठी , व महिलांचा हंडा डोक्यावरून खाली उतरवण्यासाठी , महिलांना संरक्षण देण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ताकदीनिशी आम्ही हि निवडणूक लढणार असल्याचे ” गौप्यस्फोट ” सुधाकर भाऊ घारे यांनी केला.
निवडणुकीत मी सुधाकर घारे उमेदवार नसून तुम्हीच सर्व सुधाकर घारे आहात , असे समजून निवडणुकीला सामोरे जाणार असून महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार व सर्वांच्या आधी अर्ज भरून निवडणुकीत निवडून येणारं , असे ” भाकीत ” त्यांनी व्यक्त केले . सर्वांनी आपली जबाबदारी स्वीकारून आजपासूनच कामाला लागा , असे आवाहन त्यांनी केले . सर्वाँना पक्षात मानसन्मान , सर्वांच्या सुख दुःखात मी सामील होवून सर्वांच्या अडचणी , समस्या सोडविल्या जातील , असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले .

यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत सरचिटणीस दत्ताजी मसुरकर , प्रदेश सरचिटणीस अशोक शेठ भोपतराव , प्रदेश सचिव भरत भाई भगत , प्रदेश सदस्य भगवान शेठ भोईर , उल्हास भुर्के , शरद कदम , खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे , युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे , विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर , जिल्हा उपाध्यक्षा मनसेचे सुर्वे , तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील , खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव , कमाल पाटील , रमेश जाधव , शहर अध्यक्षा वैशाली जाधव , महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील , उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड , युवा नेते कुमार दिसले , संतोष गुरव , शेखर पिंगळे , भूषण पाटील, अरुण पाटेकर, अमित देशमुख, अमोल पाटील, बाबू पोटे , गौरव दिसले, मोहन केदार, प्रसाद पाटील , सचिन मसुरकर , युवा नेते केतन बेलोसे आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page