Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न..

खालापुरात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न..


माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत पार पडलेे..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर नगरपंचायत हद्दीत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.


यावेळीं खालापुरात नगरपंचायत हद्दीतील पाण्याच्या टाकीजवल नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन,खालापूर नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, खालापुरात नवीन पाईप लाईनचे भूमिपूजन, खालापूर, नाल्यावर पूलाचे भूमिपूजन पार पडले खालापुर नगरपंचायतची निवडणूक काही दिवसांवर आली असल्याने त्यांनी नगरपंचायत हद्दीत विकास कामांचा धुमधडाका लावला आहे.


यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य आस्वाद पाटील, खालापूरचे नगराध्यक्षा रेणुका पावर, उपाध्यक्षा शिवानी जंगम, सभापती मंगला चालके, आरोग्य सभापती ममता चौधरी, राहुल चव्हाण, गटनेते दिलीप मनेर, नगरसेवक संतोष जंगम, शेकाप खालापूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -