Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात शेकाप नेते संतोष जंगम यांच्या वाढदिवसानिमित्त दीड कोटींच्या कामाचे भूमिपूजन संपन्न..

खालापुरात शेकाप नेते संतोष जंगम यांच्या वाढदिवसानिमित्त दीड कोटींच्या कामाचे भूमिपूजन संपन्न..

खोपोली-दत्तात्रय शेडगे

शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक संतोष जंगम  यांचा वाढदिवस विविध विकासकामाचे भूमिपूजन करून साजरा करण्यात आला.यावेळी कोरोना काळात मृत  योद्धांच्या स्मृतीचा ठेवा म्हणून उद्यानाला त्यांची नावे देण्याचा स्तुत्य निर्णय नगरपंचायतीने घेतला.

खालापूर तालुका शिक्षण  प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ,खालापूर नगरपंचायत नगरसेवक शेकाप नेते  संतोष जंगम यांच्या वाढदिवसानिमित्ताने खालापूर नगरपंचायत हद्दीत पोलीस ठाणे,सोमेश्वर सोसायटीत  उद्यान, शहरासाठी जलशुद्धीकरण केंद्र,मासळी बाजार,फराट आळी,मिलिंद भोसले यांचे घरापासून गटार,दलित वस्तीकडे जाणारा पूल,वनवे निंबोंडे चौकात सुशोभीकरण,सावरोली ते खालापूरकर घरापर्यंत रस्त्याचे उद्धघाटन यावेळी करण्यात आले.

खालापूर पोलीस ठाण्याच्या आवारातील उद्यानाला कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश कळमकर यांचे नाव देण्यात आले असून सोमेश्वर सोसायटीत उद्यानाला खालापूरातील युवा सामाजिक कार्यकर्ता स्व.महेश घैसास याचे नाव देण्यात आले आहे.

विकासकामाच्या उद्धघाटन  प्रसंगी खालापूर उपविभागिय पोलीस अधिकारी संजय शुक्ला,खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रेणूका पवार,उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, मुख्याधिकारी सुरेखा भणगे,पोलीस निरिक्षक अनिल विभुते, महिला पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे,नगरसेविका मंगला ,चाळके,ममता चौधरी,शारदाबाई गायकवाड,नगरसेवक राहुल चव्हाण,दिपक नाईक,दिलीप पवार यांच्यासह कोरोना योध्दांचे कुटूंब उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page