खालापुरात श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न…

0
45


आदिवासी क्षेत्र आढावा समिती राज्य मंत्री विवेक पंडित यांची प्रमुख उपस्थिती..

श्रमजीवी संघटनेच्या 38 वा वर्धापन दिनाच्या औचित्य साधत खालपुरात श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला, रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवावर होणारे अन्याय अत्याचार या विरोधात आवाज उठवून गोर गरीब आदिवासी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना जिल्ह्यात कार्यरत आहेत.


या मेळाव्याला श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी क्षेत्र समिती राज्य मंत्री वेविकभाऊ पंडित यांनी स्वःत उपस्थित राहून आदिवासी बांधवाना मार्गदर्शन केले, यावेळी श्रमजीवी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, उपाध्यक्ष दत्तू कोल्हेकर,सचिव संजय गुरव, महिला जिल्हा सचिव योगिता दुर्गे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष संतोष वाघे, नारायण विघ्ने ,खालापूर तालुका अध्यक्षा हिराताई पवार, उपाध्यक्ष राजाराम पवार, यांच्यासह जिल्ह्यातून आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.