Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूरातील डोंगरावर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.

खालापूरातील डोंगरावर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.


खालापूर शहरा जवळील मुंबई पुणे जुन्या महामार्गा जवळील डोंगरावर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणांचा मृतदेह सापडला.

खालापूर गावातील तरुण गुढीपाडवा निमित्ताने डोंगरावरील साबाई मातेच्या मंदिरात डोंगरावर देवीचा दर्शनासाठी गेले होते मात्र त्यांना परतीच्या प्रवासावेली त्या वाटेत एका झाडाला एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तरुणांनी खालापूर पोलीस ठाण्यात सर्व घटनेची माहिती दिली.

यावेळीं खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाण्यात टीम घेऊन आत्महत्या केलेल्या ठिकाणी पोहचली. व आजुबाजुला तपास करत असतात वेळी मृत व्यक्तीच्या बाजूला सीम कार्ड नसलेला मोबाईल फोन आढळून आल्याने मृत व्यक्तीची ओळख पटली असून हा मयत व्यक्ती कृष्णबंदू दीपक देबनाथ (वय 45,) रा नीमतळा – पश्चिम बंगाल मधला असून पुणे या ठिकाणी नोकरी करत होता.

अशी माहिती प्राप्त झाली आहे.तर आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली असल्याने पुढील तपास खालापूर पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page