Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूरातील मोर्बे धरणात बुडून एकाचा मृत्यू..

खालापूरातील मोर्बे धरणात बुडून एकाचा मृत्यू..

खोपोली( दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील मोर्बे धरणात अंघोळ करण्यासाठी उतरलेल्या एका आदिवासी शेतमजूराचा बुडून मृत्यू 23 अॉगस्ट रोजी झाला आहे.नविमुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोर्बे धरणात हिऱ्या महादू भला रा. तिनघर ठाकूरवाडी वय वर्षे ४९ या इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे.

हा शेतकरी आदिवासी मजूर धरणाच्या वरील भागातील रानात जळणा साठी सरपण आणण्यासाठी आपली पत्नी हिरा सह गेला होता. तिथून तो आल्यावर मोर्बे धरणाच्या काठावर पत्नीसह बसला होता, घर जवळच असल्याने तो मोर्बे धरणाच्या कडेला हातपाय धुण्यासाठी कडेला गेला मात्र त्याचा पाय घसरून तो पाण्यात गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याखाली व धरणाच्या कडेला चिखल असल्याने तो चिखलात रुतला ही बाब त्याच्या पत्नीच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा केला असता तेथे गावात असलेल्या लोकांनी धाव घेऊन त्याला पाण्याच्या बाहेर काढला तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.


ही बाब चौक चे सहाय्यक पोलिस निरिक्षक युवराज सूर्यवंशी यांना समजताच पोलिस हवालदार प्रसाद पाटील, पोलीस महेश खंडागळे यांनी त्याला चौक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक युवराज सूर्यवंशी करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page