खालापुर(दत्तात्रय शेडगे)कोरोना विषाणूने महाभयंकर रुप धारण केल्याने सर्व हैराण झाले आहेत. त्यातच या महाभयंकर विषाणूने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याने लाखो जीव सुध्दा घेतल्याचे पाहायला मिळाले असल्याने असंख्य रुग्ण या कोरोना विषाणू विरोधात झुंज देत असून काही कोरोना विषाणू लागण.
बरोबर इतरही आजार असल्याने अनेकांना कोरोना विषाणूचा सामना करताना मोठी इच्छाशक्ती व मनाचा भक्कम पणा दाखवावा लागत असून अशी खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीडखुर्द गावातील मनिषा शत्रुघ्न्य कर्णुक, 45 वर्षीय महिला घश्याचा कँन्सर असतानाही या महिलेने कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने या महिलेच्या धैर्याचे कौतुक होत असून या महिलेनी कँन्सरग्रस्त असताना कोरोनावर केलेली मात याचा सर्वानी आदर्श घेऊन कोरोना घाबरू नका असा जणू संदेशच दिला आहे.
कोरोनाला विषाणूची लागण झाल्यावर अनेकांचे मनोधैर्य खचून जात असल्याने अनेकांची या धास्तीने तब्येतीत अधिक बिघाड होत आहे, तर अनेकांनी कोरोनाला न डगमगता कोरोनाशी झुंज देत कोरोनावर यशस्वी रित्या मात केल्याचे पाहायला मिळाले आहे.
मात्र काहीना कोरोना बरोबर आधीपासून अन्य रोगाने घेरले असून अनेकांना कोरोना विषाणूशी झुंज देताना मोठी परिक्षाच द्यावी लागत असल्याने अनेक जण या भीती पायी मृत्यूमुखी पडले आहेत.तर काही निवडक रुग्ण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अन्य रोगाबरोबर कोरोना मात करीत असल्याचे पाहायला मिळत असून खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीडखुर्द गावातील मनिषा शत्रुघ्न्य कर्णुक, 45 वर्षीय महिलेला घश्याचा कँन्सरग्रस्त असतानाही त्या महिलेने कोरोनाला न घाबरता कोरोनावर यशस्वी पणे मात केल्याने या महिलेचे सर्व स्तरावरून कौतुक होत असुन या महिलेनी कोरोनाशी यशस्वी रित्या झुंज दिल्याने या महिलेनी सर्वाना कोरोना घाबरू नका असा जणू संदेशच दिला आहे.