खालापूर क्रांतीनगर येथील स्वच्छतागृहांची दुरावस्था, खालापूर नगरपंचायतचे दुर्लक्ष..

0
36

खालापूर (दत्तात्रय शेडगे)सध्या कोविडची महामारी सुरू असून सर्वत्र शासनाच्या नियमांचे पालन करून प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका प्रशासन आपला परिसर स्वच्छ ठेऊन नागरिकांना कोणताही आजार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे मात्र खालापूर मधील क्रांतिनगर येथील दलित वस्तीमध्ये स्वच्छता गृहाची प्रचंड दुरावस्था झाली असून येथील नागरिकांना रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र या परिस्थितीकडे खालापूर नगरपंचायतीचे मात्र दुर्लक्ष झालेले पहायला मिळत आहे.


२००५-०६ मध्ये ग्रामपंचायत असताना हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते. १५ वर्ष पूर्ण झाले तरी प्रशासनाचे या वस्तीकडे दुर्लक्ष झालेले आहे. एकीकडे नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये चर्चेत आहे आणि एकीकडे मात्र स्वछता गृहाची गैरसोय होत असल्याने नागरिक मात्र संतप्त झाले आहेत.

या स्वच्छता गृहांच्य ठिकाणची लाइटची फिटिंग काही वर्षापूर्वी केली असून त्याचीही दुरवस्था झाली असून येथे लाईट आणि पाण्याची देखील गैरसोय झाली आहे. यामुळे येथील अबाल, वृध्द आणि महिलांची ग़ैरसोय होत आहे. तरी या दलित वस्तीमधील स्वच्छता गृहांची नगरपंचायत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आमची मागणी पूर्ण करावी असे येथील महिलांचे म्हणने आहे.