Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी सुधीर माने यांची फेरनिवड..

खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी सुधीर माने यांची फेरनिवड..

खालापूर – प्रतिनिधी

खालापूर तालुकाग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी पत्रकार सुधीर माने यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली.

खालापूर तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील व ग्रामीण भागातील नवीन पञकाराना आपल्या परीने समस्या मांडण्या करीता हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेऊन त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न खालापूर तालुक्यातील साप्ताहिक खालापूर वार्ता चे संपादक सूधीर गोविंद माने यांनी करून दिलासा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
त्यामुळे खालापूर रेस्ट हाऊस मध्ये पञकार संघाचे प्रतिनिधी यांनी सन २०२१ च्या कार्य कारणी जाहीर करताना सूधीर गोविंद माने यांची नुकतीच खालापूर तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी पत्रकार खलील सुर्वे, दत्ता शेडगे ,गयासूददीन खान सूधीर देशमुख जमालूदीन शेख संतोष मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page