Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर तालुक्यात कोविड रुग्णालयासाठी खासदार बारणे आणि आमदार थोरवेंकडून कारखान्याना सूचना..

खालापूर तालुक्यात कोविड रुग्णालयासाठी खासदार बारणे आणि आमदार थोरवेंकडून कारखान्याना सूचना..

१ मे पासून खोपोलीत सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू होण्याचे संकेत..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)कोरोना या महामारीच्या आजाराने संपूर्ण देशभरात थैमान घातले आहे दिवसागणिग या आजाराचे बाधित रुग्ण आढळून येत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटल ही कमी पडत आहेत अशी परिस्थिती असताना वर्षभरानंतर पुन्हा कोरोना ची दुसरी लाट सुरू झाल्याने या आजाराने भयानक रूप घेतल्याने यात मृत्यूचा दर ही वाढला आहे.

त्यामुळे सर्वत्र वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून खोपोली शहरात व खालापूर तालुक्यात ही वाढते रुग्ण आढळून आले असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालय मिळत नसल्याने खोपोली आणि खालापुरातील सर्वपक्षीय प्रतिनिधी एकत्र येऊन रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न केल्याने या रुग्णालयासाठी आमदार महेंद्र थोरवे यासह कारखानदारी आणि खोपोली नगरपालिका पुढे आली असून येत्या काही दिवसात ५० बेडचे सर्व सोयीयुक्त रुग्णालय तयार होईल असे चित्र निर्माण झाल्याने मंगळवारी तहसील कार्यालय खालापूर येथे खासदार श्रीरंग बारणे, आणि आमदार महेंद्र थोरवे आणि खोपोली खालापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांच्या अधिकृतपणे बैठक घेऊन सामाजिक दायित्व फंड वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या असून येत्या 1 मे पासून हे कोविड हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे संकेत या बैठकीच्या निमित्ताने देण्यात आले आहे.


खोपोली शहरात आणि खालापूर तालुक्यात कोरोना बाधित रुगणांच्या आकड्यात दिवसेंदिवस कमालाची वाढ होत असल्याचे चित्र अनेक दिवसांपासून असल्याने अनेकांना उपचाराठी बाधित रुगणाची ससेहोलपट सुरू होती यावर मार्ग काढण्यासाठी खोपोली आणि खालापूर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक हेतून बैठका घेतल्या यात चारही बाजूने कशा पध्द्तीने कोविड रुग्णालय तयार करता येईल याबाबत खोपोली नगरपालिकेसह खालापुरात बैठका झाल्या यात कोविड रुग्णालयाच्या निर्मिती साठी कारखानदारीने मदतीचा हात देण्याची भावना समोर आली त्याच बरोबर खोपोली नगरपालिका सह आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला 50 लाखाचा आमदार निधी आणि वयक्तिक औषधांचा खर्च यावर अगदी सविस्तर पणे चर्चा करण्यासाठी तसेच इंडस्ट्रीज असोशियनशी अधिकृत चर्चा करून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेंद्र थोरवे खालापूर चे तहसीलदार इरेश चप्पलवार अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होतेे.


यावेळी खासदार बारणे यांनी सर्व कारखान्यांनी सामाजिक दायित्व फंड वापरण्याच्या अधिकृत सूचना केल्या यावेळी या रुग्णालयाला लागणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कामगार कर्मचारी वर्गाचा वेतन जवळपास १४ लाखाहून अधिक होत आहे त्याची जबाबदारी देण्यात आली या बैठकीला असोशियन चे जवळपास २५ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंबतर खोपोली खालापुरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली असून याबैठकीत अनेक भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, तहसीलदार इरेश चप्पलवार, नगराध्यक्षा सुमन औसरमल मुख्याधिकारी गणेश शेटे गटविकास अधिकारी संजय भोये जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील प स सभापती वृषाली पाटील माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर खालापूर नगर पंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे उपसभापती विश्वनाथ पाटील गटनेते सुनील पाटील ,नगरसेवक मोहन औसरमल नवीन दादा घाटवळ,राजेंद्र येरूनकर ,नरेंद्र गायकवाड, एकनाथ पिंगळे, संतोष जंगम, अंकित साखरे, ऍड मुनिदास गायकवाड ,वैभव भोईर,संदीप पाटील, भगवान पाटील,महेश सोगे,वैभव भोईर संजय म्हामूनकर यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page