दस्तुरी येथे अज्ञाताकडून गाईंची हत्या करून गोमांस पळविले..
खोपोली(दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील बोरघाटात घाटात दस्तुरी हे गाव असून या गावाशेजारी काही अज्ञातांनी गाय कापून तिचे गोमांस पलविल्याचे धक्कादायक घटना घडली आहे,गेल्या काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणाहून एक म्हैस व एक गाय कापून तिचे गोमांस पळविले होते त्याचप्रमाणे रात्री अंधाराचा फायदा घेत दस्तुरी येथील एक्सप्रेस हायवेच्या शेजारून एक गाय कापून तिचे गोमांस पलविल्याची घटना घडली आहे.
घाटमाथ्यावर दस्तुरी,दत्तवाडी गारमाल, येथील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत तर त्यांचे उत्पादनाचे साधनही दूध दूध व्यवसाय आहे मात्र काही दिवसांपासून तालुक्यात अज्ञातांकडून गाय, म्हैस, बैल चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे.
यामुळे येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे,
त्याचप्रमाणे रात्री ही अज्ञातांनी दस्तुरी येथून एक गाय कापून तिचे गोमांस पळविल्याची धक्कादायक घटना घडली आहे, सकाळी तेथील ग्रामस्थ बबन शेडगे यांच्या ते निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ या घटनेची खोपोली पोलिसांना माहिती दिली व खोपोली पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.