Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम राबवली..

खालापूर तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम राबवली..


खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर तालुक्यात आज प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.आज संपूर्ण राज्यभर सगळी कडे लहान बालकांसाठी ही पोलिओचे दोन थेंब देऊन पल्स पोलीस अभियान राबविण्यात आले.
त्याचप्रमाणे आज खालापूर तालुक्यातही सगळी कडे ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत नुकतेच जन्मलेले बाळ, यापूर्वी डोस दिला असला तरीही बाळाला डोस देण्यात आला, शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना यावेळी पोलिओचा डोस देण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिकारी अनिल शाह, आरोग्य अधिकारी श्याम गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी विशाल दातीर,संदीप नाटकर, संदीप जाधव, आरोग्य सेवक श्याम पवार आदी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page