Wednesday, September 11, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलिसांकडून आदित्य वृद्धाश्रमांस जीवनावश्यक वस्तुसह मास्क आणि सॅनिटायझर वाटप...

खालापूर पोलिसांकडून आदित्य वृद्धाश्रमांस जीवनावश्यक वस्तुसह मास्क आणि सॅनिटायझर वाटप …

खालापूर (दत्तात्रय शेडगे) तालुक्यातील सगळीकडे कोरोना आजाराने थैमान घातले असून या काळात गोर गरीब जनतेचे हाल होत आहेत ,मात्र आता खालापूर पोलिसांनी एक हात मदतीचा पुढे करत आज खालापूर तालुक्यातील महड येथे असलेल्या आदित्य वृद्धाश्रमात भेट देऊन येथील वृद्ध नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

खालापूर पोलिसांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा म्हणून तालुक्यातील पाच गावे दत्तक घेतली आहेत तर आज महड येथे असलेल्या आदित्य वृध्दाश्रमात भेट देऊन वृद्ध नागरिकांची विचारपूस करत त्यांना जीवणावश्यक वस्तूसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी पोलीस उपविभाय अधिकारी खालापुरचे संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, पोलीस नितीन शेडगे, समीर पवार, विठ्ठल घावस, जगदिश वाघ, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page