Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलिसांची गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धवली वडवळमध्ये जुगारावर धाड....

खालापूर पोलिसांची गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धवली वडवळमध्ये जुगारावर धाड….

खोपोली ( दत्तात्रय शेडगे)
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाल्याने अनेक गणेश भक्तांच्या आनंदाला उधाण आले असून काहि गणेश भक्त गणेशोत्सवाच्या नावाखाली शासनाने बंदी घातलेल्या जुगाराला अधिक महत्त्व देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर जुगार खेळ नका असे आवाहन खालापूर पोलिसांनी केले असतानाही काही मंडळी छुप्या पध्दतीने धवली वडवळ गावात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूतेंना मिळताच या जुगारावर खालापूर पोलिसांनी धाड टाकत 8 जुगारी मंडळींना ताब्यात जवळपास 18 हजारांची रक्कम जप्त केली असून.या कारवाईने अनेक धास्तावले आहेत.

गणेशोत्सवामध्ये रात्री जागरण करता यावे यासाठी टाईमपास म्हणून पत्ते खेळत असल्याने अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी ठरवून जुगार अड्डे चालविले जातात. त्यासाठी खास जुगार खेळणाऱ्यांना बोलावले जाते. जुगार खेळण्यासाठी पैसे घेतले जातात. लाखो रुपयांची उलाढाल होत असून अनेकांचे संसार या जुगारामुळे उदध्वस्त होत असल्याने जुगारावर बंदी घालण्यात आली असली तरी काही जुगारी मंडळी छुप्या पध्दतीने खेळत हजारो रुपये जुगारी लावत असतात.

तर गणपती उत्सवात खालापूर पोलिसांनी गणेश भक्तांसाठी विशेष नियमावली जाहीर करीत शासनाच्या नियमावली पालन करण्याचे आवाहन खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला व खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी केले असून सर्व स्तरावरुन पोलिसांच्या नियमाचे पालन करित गणेशोत्सवाचा आनंद गणेश भक्त लुटत असताना काही मंडळी या गणेशोत्सवाच्या नावाखाली हजारो रूपयाची उलाढाल करीत हजारो रुपये जुगारी लावत.

असल्याने या जुगार खेळण्याला आळा बसावा म्हणून खालापूर पोलिसांनी गुप्त टिम तयार करित ज्या – ज्या ठिकाणी जुगार खेळत आहेत याची माहिती जाणून घेत असताना धवली वडवळ गावात जुगार खेळण्याची माहीती खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांना मिळताच पोलिस निरिक्षक विभूते यांनी सहकारी वर्गाला कारवाईचा आदेश देताच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धवली वडवळ गावातील जुगारावर खालापुर पोलिसांनी धाड टाकून जवळपास 18 हजारांची रक्कम जप्त करीत 8 जुगारी मंडळींना ताब्यात घेतले आह.

- Advertisment -

You cannot copy content of this page