खालापूर पोलिसांना बढती कर्तव्याची दखल….

0
25

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
राज्यात रायगड पोलिसांचा एक नंबर लागला असून या आनंदाच्या बातमी बरोबर खालापूर पोलिसांनाही बढती मिळाल्याने खालापूर पोलिसांच्यात आनंद साजरा करण्यात आला.


गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांना आनंदाची बातमी मिळाल्यावर खालापूर पोलिसांनाही आनंदाची बातमी कळली. पोलीस खात्यात आपल्या कर्तव्याची जाण ठेऊन केलेल्या कामाची वरीष्ठ पातळीवर दखल घेतली गेली.रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सहायक फौजदार,पोलीस हवालदार,पोलीस नाईक यांना बढती दिली आहे.

खालापूर पोलीस ठाण्यात रुजू असलेल्या नितीन शेडगे,अमित सावंत,तुषार सुतार,पंकज खंडागळे यांना पोलीस हवालदार तर विशाल सावंत,दत्तात्रय किसवे,गणेश शिंदे,संदेश म्हात्रे,कुर्बान तडवी,जगदीश वाघ,नितीन सावरटकर,जयेश कुथे,महिला पोलीस भारती नाईक,सोनम शेळके यांना पोलीस नाईक म्हणून बढती मिळाली आहे.खालापूर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांच्या सहकाऱ्यांनी बढती मिळालेल्या पोलीसांच्या खांद्यावर फीत लावून त्यांचे अभिनंदन केले व पुढील कर्तव्यास शुभेच्छा दिल्या.