Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलिसांनी पाच लाखाचा गुटखा पकडला..

खालापूर पोलिसांनी पाच लाखाचा गुटखा पकडला..

खालापूर पोलिसांची दमदार कामगिरी..डी.वाय.एस.पी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई.

खालापूर (दत्तात्रय शेडगे)सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो, चौक फाटा येथे सापळा रचून गावठी बनावटीचे दोन पिस्तुल व जिवंत काडतुस हस्तगत केल्यानंतर गुरुवारी दुपारी दि.२२ एप्रिल रोजी खालापूर तालुक्यातील माजगाव येथे माही किराणा स्टोअर्स वर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी हस्तगत केला, सदर कारवाई ही संजय शुक्ला उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्या आदेशाने करण्यात आली.


गुरुवार दिनांक २२ एप्रिल रोजी डीवायएसपी संजय शुक्ला यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्‍या माहि किराणा स्टोअर्स मध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळताच डीवायएसपी शुक्ला यांनी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल यांच्या नावे झडती वॉरंट देऊन कारवाईचे आदेश दिला. कारवाई आदेश मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल, महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव त्यांची टीम माजगाव येथे रवाना झाली.


सदर ठिकाणी पोलीस गेले असता त्यांनी प्रथम दोन पंचांना बोलून घेतले. त्यानंतर त्यांनी माहि किराणा स्टोअर्स त्या दुकानात गेले असता हजर असलेले इसमास आवाज देऊन बाहेर बोलावले त्यांना नाव विचारले असता त्यांनी नरेश लक्ष्मण पाटील वय.42 वर्ष राहणार माजगाव असे सांगितले, सदर इसमास आम्हाला तुमच्या दुकानाची झडती घ्यायची असल्याचे सांगून झडती वॉरंट दाखविले व त्यानंतर पोलिसांनी आमची झडती घ्या असे सांगितले मात्र नरेश पाटील यांनी झडती घेण्याची काय आवश्यकता नसल्याचे सांगून दुपारी ३.४० वाजता दुकानात प्रवेश केला.

मात्र सदर दुकानात काहीही न मिळाल्याने मागील बाजूस असलेल्या गोडाऊनची झडती घ्यायची असल्याचे सांगितले, सदर गोडाउन मध्ये प्रवेश केल्यानंतर गोडाऊनच्या एका कोपऱ्यात किराणा सामनामध्ये सफेद रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या दिसून आल्या, त्यामध्ये काय असल्याचे पोलिसांनी विचारले असता नरेश लक्ष्मण पाटील यांनी सांगण्यास टाळाटाळ केली, नरेश पाटील हे टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांचा संशय अजून दृढ झाला व त्यांनी गोणी उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा पान मसाला आढळून आला.

हा गुटखा पान मसाला कुठून आणला अशी माहिती विचारले असता त्यांनी ती माहिती देण्यास देखील टाळाटाळ केली.
सदर गोडाउन मध्ये सफेद रंगाच्या दहा गोणी मध्ये केशरयुक्त विमल पान मसाला असे लिहिलेले 2301 पाकिटे प्रत्येकी पाकिटाची किंमत 157 रुपये असा 4 लाख 30 हजार 286 रुपये तसेच दुसऱ्या 5 प्लास्टिकच्या गोणी मध्ये v-1 तंबाखू असे लिहिलेले 1865 पाकिटे प्रत्येक पाकिटाची किंमत 33 रुपये असे एकूण 61 हजार 5455 रुपये तसेच दुसरा एक गोणीमध्ये राज कोल्हापुरी असे लिहिलेले 157 पाकिटे त्याचे अंदाजे किंमत 165 रुपये त्याची किंमत 25 हजार 905 रुपये, असा एकूण 5 लाख 17 हजार 737 रुपये किमतीचा माल खालापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे.


तर सदर इसमा विरुद्ध खालापूर पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.स.कलम 328, 272, 273 सह अन्न नागरी सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे, सदर कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल, महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव, पोलीस हवालदार धनवी, पोलीस हवालदार निलेश कांबळे, पोलीस नाईक अमित सावंत, पोलीस शिपाई केंद्रे त्यांनी ही कारवाई फत्ते केली, सदर कारवाईमुळे खालापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -