Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलिसांनी बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करणाऱ्या पकडले रंगेहात..

खालापूर पोलिसांनी बेकायदेशीर रित्या हत्यारे विक्री करणाऱ्या पकडले रंगेहात..


खोपोली- दत्तात्रेय शेडगे


खालापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे गुप्तहेर बातमीदारांकडून खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चौक या गावाच्या परिसरात एक इसम देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे विक्री करता आणणार आहे अशी माहिती मिळाली होती.


मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याकरता सहाय्यक पोलिस निरिक्षक नवले, पोलीस हवालदार राजा पाटील, दुसाने पिंपळे, प्रतीक सावंत असे पथक तयार करून चौकफाटा (खालापूर) याठिकाणी सापळा लावून असताना एका रिक्षातून एक संशयित इसम रा. चिताकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई हा खाली उतरून रस्त्याच्या एका बाजूने संशयितरित्या जात असताना नमूद पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील बॅगची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये खालील वर्णनाचे 2 गावठी कट्टे आणि 6 पितळी जिवंत राउंड मिळून आले.


18 हजार रुपये किमतीचा 5 इंच लांबीचा लोखंडी बॅरल असलेला लोखंडी गावठी कट्टा. 18 हजार रुपये किमतीचा 6 इंच लांबीचा लोखंडी बॅरल असलेला लोखंडी गावठी कट्टा 3000 रुपये किमतीचे 6 जिवंत राउंड इत्यादी इसमाकडे वरील वर्णनाचे बेकायदेशीर, अवैद्य दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत रांऊड मिळाल्याने त्याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं 92/2021 शस्त्र अधिनियम 1959, विनापरवाना अग्नीशस्त्र (कलम 3/25) प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -