Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखासदार श्रीरंग बारणे थेट खालापूरातील शेताच्या बांधावर, भात...

खासदार श्रीरंग बारणे थेट खालापूरातील शेताच्या बांधावर, भात पिकांच्या नुकसानीची केली पाहणी…

प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे

खालापुर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी 18 अॉक्टोबर रोजी प्रत्यक्ष खालापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी मधील संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरीअडचणीत आहेत. खालापुर तालुक्यातील बहुतांशी भागात प्रामुख्याने भात पिकाचे अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शेतात जाऊन घेतली. तर बारणे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश खासदार बारणेंनी दिले आहेत.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, तहसिलदार इरेश चप्पलवाल, नायब तहसिलदार कल्याणी मोहिते, पंचायत समितीचे पोळ, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख उमेश गावंड, खालापूर शहरप्रमुख पदमाकर पाटील, कृषी आधिकारी अर्चना सुळ, सहाय्यक पुजारी, तलाठी सुर्वणा कोल्हे, आर.बी.कवडे, माधव कावरखे, ढाकणे, अभीजित हिवरकर, यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
- Advertisment -