खासदार श्रीरंग बारणे यांची नगराध्यक्षांनी घेतली सदिच्छा भेट..

0
105

माथेरान । दत्ता शिंदे ।

माथेरान मधील विविध समस्या आणि वेळोवेळी निर्माण होत असणाऱ्या अडचणींवर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा जेणेकरून इथल्या सर्वसामान्य लोकांना त्याचप्रमाणे पर्यटकांना अडचणी भासणार नाहीत.असे माथेरान नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा,उत्तम प्रशासक प्रेरणा सावंत यांनी मावळचे खासदार तथा संसदरत्न श्रीरंग बारणेंच्या निदर्शनास आणून दिले.


आज दि.२७ रोजी अलिबाग येथील जिल्हापरिषद विश्राम गृहात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी इथल्या विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी सांगितले यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या सह माथेरान नगरपालिका गटनेते, तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत, कर्जतच्या विद्यमान नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, केतन जोशी,कर्जतचे माजी नगरसेवक संतोष पाटील आदी उपस्थित होते.


पावसाळा संपून लवकरच माथेरानचा मुख्य सुट्टयांचा हंगाम सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर पर्यटकांना उपलब्ध अशा सोयीसुविधा करणे आवश्यक आहे. ईथे येणारे पर्यटन हे मोटार गाडीने उतरल्यावर शटल ट्रेनने येत असतात तर बहुतांश पर्यटक हे अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान रेल्वेच्या बाजूने पायी चालत येतात.याच रेल्वेच्या रुळांच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविल्यास त्यावरून पर्यटक आपले अवजड सामान सुध्दा अगदी सहजपणे आणू शकतात यासाठी येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये हा प्रस्ताव करण्यात यावा असे गटनेते प्रसाद सावंत यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे स्पष्ट केले.