Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाखासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोणावळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन…

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोणावळ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन…

लोणावळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून लोणावळा शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि.5 जानेवारी रोजी संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संपूर्ण सुशोभीकरण करण्यासाठी 30 लक्ष तर रायवूड येथील शिवाजी पार्क सुशोभीकरण यासाठी 50 लक्ष रुपये असा निधी मंजूर झाला असून. याठिकाणी पर्यटन विभागानंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, शरद हुलावळे, अंकुश देशमुख,आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, यमुनाताई साळवे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी यांसह बाळासाहेबांची शिवसेना, आर पी आय व भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page