Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळखासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्ला येथे युवा सेनेच्या वतीने मोफत आरोग्य...

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्ला येथे युवा सेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

कार्ला (प्रतिनिधी): संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्ला येथे मंगळवार दि.21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन युवा सेना मावळ तालुकाध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त एम्स हॅास्पिटल औंध व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात हृदय विकार, मधुमेह,मुतखडा ,शुगर तपासणी ,रक्त तपासणी, प्रोस्टेस्ट ग्रंथांची वाढ, टॅान्सिल,श्वसनाचे आजार, जुनाट सर्दी,दमा,थायरॉईड,लहान मुलांचे सर्व आजार,मेंदूच्या समस्या, किडनीच्या समस्या,मुळव्याध,बद्धकोष्ठता, डोके दुखी/माईग्रेन, ई.सी.जी,स्त्री व पुरूषांचे लैंगिक विकार,स्त्रीयांच्या पाळी संबंधीत समस्या,जेष्ठ नागरिकांचे विकार ही तपासणी केली जाणार आहे. तसेच हृदय विकाराच्या शस्त्रक्रिया अल्पदरात होणार आहेत.
तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page