Sunday, September 24, 2023
Homeक्राईमखुनातील फरार आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात...

खुनातील फरार आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात…

लोणावळा दि.3: शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील 302 गुन्ह्यातील फरार आरोपी विठ्ठल मोरे याला ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून केली अटक.


आरोपी विठ्ठल केशवराव मोरे ( वय 35 वर्ष, रा. पानशेवडी, ता. कंधार, जि. नांदेड ) याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गु र नं 266/2021 भा द वी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल असून तो फरार झाला होता.

विठ्ठल मोरे हा पवना नगर येथील राजयोग हॉटेल येथे येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर शिरूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नाजिम पठाण, लोणावळा ग्रामीणचे पोलीस नाईक जितेंद्र दिक्षित, संतोष शेळके, पोलीस मित्र श्रीकांत घरदाळे यांच्या पथकाने पवना नगर येथे सापळा रचून आरोपी विठ्ठल केशवराव मोरे याला ताब्यात घेतले.

- Advertisment -