खोपोलितील वाहून गेलेल्या दोन्ही मुलांचा मृतदेह सापडल…

0
68

अपघातग्रस्त टीमच्या अथक प्रयत्नांना यश…

प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खोपोलीतील क्रांतीनगर येथील ओढ्यात दोन लहान मुले वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली होती,त्या दिवसापासून पासून खोपोली येथील अपघात ग्रस्त टीम.

खोपोली पोलीस हे शोध घेत होते, मात्र मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे त्यांना शोध घेण्यात अडथळा येत होता, नंतर दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह पाताळगंगा नदीत महड येथे सापडला तर मुलाचा मृतदेह काल रात्री उशिरा खालापूर निंबोडे येथे सापडला, खालापूर तालुक्यातील गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असुन अश्या परिस्थितीत हे दोन्ही मुलांचे मृतदेह शोधून काढल्याने तालुक्यातील सर्वत्र कौतुक होत आहे.