Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलित शिक्षक जितेंद्र देशमुख यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार..

खोपोलित शिक्षक जितेंद्र देशमुख यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार..

खोपोली ( दत्तात्रय शेडगे)
खोपोलीतील जनता विद्यालयाचे शिक्षक जितेंद्र देशमुख यांना आविष्कार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आविष्कार फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे पार पडला.


यावेळीं खालापूर तालुक्यातील खोपोलित जनता विद्यालयाचे शिक्षक जितेंद्र देशमुख यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक जितेंद्र देशमुख यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


यावेळी आविष्कार फाउंडेशन या शैक्षणीक व सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे कोकण अध्यक्ष आबासाहेब पवार, सचिव दिलीप मोरे यांनी देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यासाठी शिफारस केल्याने वरीष्ठ पातळीवर मूल्यांकन करून सदरचा पुरस्कार देण्यात आला, रयत शिक्षण संस्थचे सरोज भाई पाटील, उधोजक डॉ एम बी शेख शिक्षण समूहाचे डॉ भारत खराटे, सेक्रेटरी प्रभाक सितावरणाकर, किसनराव कुराडे संचालक उगारे,आर वाय गायकवाड, गाडगे महाराज,नितीकेश पाटील, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, दक्षिण विभाग अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, शैला कांबरे सुजाता कलाजे,आप्पासाहेब हरमलकर,सुनीत पाटील रंगराव सुर्यवंशी, जयश्री पाटील सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page