![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे
आगामी काळात खोपोली नगरपालिकेची निवडणूक होणार असून यासाठी आतापासून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत यातच शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरू केली असून आज खोपोलित शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका निर्मला किसन शेलार व युवासेना खालापूर तालुका समनव्यक सिद्धांत किसन शेलार यांच्या माध्यमातून या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आले.
शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी उपनागराध्यक्ष स्वर्गीय किसन मामा शेलार यांनी खोपोलित शिवसेना संघटना वाढविण्याचे मोठे काम केले असून अजूनपर्यंत एकनिष्ठ राहिले होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गोर गरीब जनतेच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सिद्धांत शेलार हे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.