Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलित सहज स्वर्ग रथाचे उदघाटन….. सहज सेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम,

खोपोलित सहज स्वर्ग रथाचे उदघाटन….. सहज सेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम,

खोपोली- दत्तात्रय शेडगे

सगळी कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून या आजाराने दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यासह खालापुर तालुक्यात कोरोना व्हारायस चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून काहींचा मृत्यूही होत आहेत.

खोपोली नगरपालिका हद्दीतील निधन होणाऱ्या नागरिकांसाठी विविध मार्गाने अंतिम विधिसाठी स्मशान भूमी पर्यंत न्यावे लागते, मात्र आता सहज सेवा संस्थेच्या माध्यमातून मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी आता घरापासून ते स्मशान भूमी पर्यंत नेण्यासाठी निशुल्क सहज स्वर्गरथ उपलब्ध करून दिला आहे त्याचे आज उदघाटन नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते पार पडले, सहज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शेखर जांभळे यांच्या माध्यमातून विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे, या उपक्रमाचे खोपोली शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळीं माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गणेश शेट्टे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,नगरसेवक मंगेश दळवी, किशोर पानसरे, निजामुद्दीन जळगावकर, सहज सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शेखर जांभळे आदी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page