Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीजवळ जवळ एक्सप्रेस वे वर सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात…

खोपोलीजवळ जवळ एक्सप्रेस वे वर सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात…

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली एक्सिट जवळ सात ते आठ वाहने एकमेकांना धडकून अपघात झाला आहे.एक्स्प्रेस वेवर झालेल्या या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे.
हा अपघात एवढा विचित्र आहे की यात अनेक वाहने एकमेकांना धडकली, एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी असल्याचे दिसत आहे.या आघातात सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना खोपोली पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असून या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये दोन ट्रक आणि काही गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page