Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीतील पशुवैद्यकीय दवाखाना दरवर्षी पाण्यात..

खोपोलीतील पशुवैद्यकीय दवाखाना दरवर्षी पाण्यात..

पावसाळ्यात दवाखाण्यात शिरते पाणी प्रशासनाचे दुर्लक्ष…

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
खोपोली येथे असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पावसाचे पाणी शिरले असून त्या पाण्यातच डॉक्टर आणि कर्मचारी यांना काम करावे लागत आहे.

खालापूर तालुक्यातील खोपोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पशुवैद्यकीय दवाखाना यात या दवाखान्याअंतर्गत बारा गावे येत आहेत,या गावात बहुतेक नागरिकांकडे गाई, म्हशी, बकऱ्या, यासारखे पाळीव प्राणी आहेत, त्यांना सेवा देण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी शासनाने खोपोली येथे दवाखाना उभारला आहे.

मात्र त्या दवाखान्यात ऑफिस आणि, गॅलरीत दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहेत, याचा नाहक त्रास डॉक्टर, कर्मचारी आणि दवाखान्यात येणाऱ्या नागरीकास होत आहे, त्या पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत आहे, याकडे प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

- Advertisment -