खोपोलीत जनता कर्फ्फु ला उत्फुर्त प्रतिसाद कोरोना साखळी तोडण्यास होणार मदत..

0
38

खोपोली प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे. सगळीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असून सरकारने 1मे पर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यातच खोपोलीतही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत खोपोलीतील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे चे कार्यकर्ते एकत्र येत खोपोलीत तीन दिवसांचा जनता कर्फ्फुचे लावण्यात आला आहे हा कर्फ्फु 17 एप्रिल ते 19 एप्रिल या तीन दिवसात आहे याला खोपोलीतील जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे.

फक्त मेडिकल सेवा वगळता सर्व भाजीपाला, मार्केट, किराणा आदीसह सगळी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे, त्यामुळे आज सकाळ पासून जनता कर्फ्फुला चांगला प्रतिसाद देत नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले आहे