खोपोली.सर्वपक्षीय नेते, व्यापारी, पत्रकार, सामाजिक संस्था व प्रशासन यांच्या उपस्थितीत निर्णय.कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शहरात प्रादुर्भावाची चैन तोडणे गरजेचे आहे. यासंदर्भात खोपोली नगरपरिषदेच्या प्रांगणात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विविध मान्यवरांच्या चर्चेतून तीन दिवसीय खोपोली कर्फ्फु लावण्याचा संकल्प करण्यात आला. १७ ते १९ एप्रिल रोजी खोपोलीत जनता कर्फ्फु लावण्यात आला असुन खोपोली तीन दिवस बंद राहणार आहे.यावेळी फक्त विशिष्ट वेळेसाठी ( सकाळी 06.00 ते सकाळी 10.00 ) दूध व मेडिकल दुकाने सुरू राहतील.
या बैठकीत नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, गटनेते सुनील पाटील, मोहन औसरमल, मंगेश दळवी, माधवी रिठे, किशोर पानसरे, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते नवीन घाटवळ, राजेंद्र येरूनकर, संतोष जंगम, एकनाथ पिंगळे, ईश्वर शिंपी, तात्या रिठे, बाबूभाई ओसवाल, राजू अभानी, सुभाष पोरवाल, कांतीलाल पोरवाल,अशोक ठकेकर,इंदरमल खंडेलवाल,मनोज माने,राजेंद्र फक्के, यशवंत मोहिते, मार्केट असोसिएशन, रिक्षा असोसिएशनचे प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.