Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीत पालकमंत्री यांनी घेतला कोरोना रुग्णालयाचा आढावा..

खोपोलीत पालकमंत्री यांनी घेतला कोरोना रुग्णालयाचा आढावा..

खोपोली (दत्तात्रय शेडगे)खोपोलीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज सुरू होणाऱ्या कोरोना हॉस्पिटल संदर्भात आढावा घेतला.फायर ऑडिट,ऑक्सीजन लाइन यांचे ऑडिट करणे गरजेचे तसेच दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व सुरक्षा साधनांची तपासणी करणे गरजेचे आहे.

सदर हॉस्पिटल कॉलेजच्या इमारतीत असल्याने त्याची कालमर्यादा यावर परखड मत त्यांनी व्यक्त केले.सर्व ना हरकत घेऊनच हॉस्पिटल सुरू करावे अशी सूचनाही त्यांनी केली. महाविद्यालयात कोविड हॉस्पिटल सुरू करताना येणार असलेल्या अडचणी यावर भाष्य केले.याचवेळी खोपोली नगरपरीषदेचे हॉस्पिटल मध्ये कायम स्वरूपी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी सुद्धा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन व त्यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

DCHC सेन्टर सुरू करण्यासंबंधी स्थानिक प्रशासन यांनी यावर सविस्तर चर्चा केली.यावेळी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी,खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार,नगराध्यक्षा सुमन औसरमल,खोपोली नपाचे मुख्याधिकारी गणेश शेटे, खालापूर च्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेवक मोहन औसरमल,मनेश यादव,वैशाली जाधव,रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, खालापूर पंचायत समितीचे विश्वनाथ पाटील ,स्थानिक नेते दत्ता मसुरकर, नवीन घाटवळ, संतोष जंगम,उल्हासराव देशमुख,नरेंद्र गायकवाड,राजेंद्र येरूनकर,भरत मिश्रा,अंकित साखरे,एकनाथ पिंगळे,अतुल पाटील,संतोष बैलमारे, ईश्वर शिंपी, मुनिदास गायकवाड,हेमंत नांदे,शिरीष बिवरे,इंदरमल खंडेलवाल,महेश सोगे,देहू म्हामूनकर,भास्कर लांडगे,महेश काजळे,विनोद राजपूत,विस्तार अधिकारी संजय भोये,डॉ. काळे,खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page