खोपोलीत येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न..

0
61


प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची यांची प्रमुख उपस्थिती …

दिनांक 25 खोपोली येथे कर्जत खालापूर तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक लोहाना समाज सभागृह येथे संपन्न झाली.


या आढावा बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्य व विविध उपक्रम राबविले जातात त्या अनुषंगाने महिला यांनी सहभागी होण्याचे आव्हान या बैठकीत रुपाली चाकणकर यांनी केले.

या आढावा बैठकी प्रसंगी नगराध्यक्षा खोपोली नगरपरिषद सुमन औसरमल माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, महिला जिल्हाध्यक्षा गिता पालरेच्या,यांच्या सह कर्जत खालापूर तालुक्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्या सहभागी झाले होते.