Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोलीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा केला निषेध.. गॅस आणि पेट्रोल दरवाढी...

खोपोलीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा केला निषेध.. गॅस आणि पेट्रोल दरवाढी विरोधात केले आंदोलन…

खोपोली (दत्तात्रय शेडगे )राष्ट्रवादी कॉग्रेस खोपोली शहर यांच्या वतीने आज खोपोलित केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गँस दरवाढ, रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ तसेच चक्रीवादळात न झालेली मदत केंद्र सरकार महाराष्ट्रावर करीत असलेल्या अन्यायाचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहराच्या वतीने आज खोपोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील प्रारंगणात कोरोनाचा सामाजिक अंतर पालन करिच्या केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

यावेळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देण्यात आले.’देश मे मोदी है – तो महंगाई है. ‘कोरोनाने वाचलो अन महागाई ने मेलो’ अशा घोषणा व नारेबाजीतून केंद्र व मोदी सरकारचा निषेध व निदर्शने करण्यात आले. चुलीत घाला तुमची प्रधानमंत्री उज्वला योजना असा नाराजीचा सूरही यावेळी महिलांनी काढला असून जीवनावश्यक वस्तूंचे दिवसेंदिवस भाव वाढ होत असल्याने व मुख्यतः गॅस दरवाढ तर अक्षरश: आकाशाला भिडत असल्याने घरगुती आर्थिक बजेट कोलमडत आहे.

यासाठी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, नगरसेवक मोहन औसरमल, कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख शिरीष भिवरे, सुधीर तेंडुलकर, विनोद राजपूत, संजय गायकवाड मनीष यादव, राष्ट्रवादी युवक विद्यार्थी निखिल पालांडे, माजी नगरसेवक सचिन मसुरकर, दिनेश गुरव, राजेंद्र फक्के, इंद्रसेन घोडके आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page